आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागापर्यंत मजल मारली. गुरुवारी मान्सून सोलापूरपर्यंत आला होता. गेल्या २४ तासांत ताशी ६.४ किमी प्रवास करत मान्सून बीडमध्ये दाखल झाला आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, बारामती, सोलापूर, वर्धा, रायपूर, संबळपूर अशी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारी मान्सून तळकोकणात दाखल झाला होता.
राज्यात पावसाचा जोर
राज्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी नगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला.
राज्यात दोन दिवस पावसाचे
१३ जून : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
१४ जून : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार तर विदर्भात मुसळधार पाऊस शक्य.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.