आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मान्सून अपडेट:राज्यात मान्सून दोन दिवस उशिराने येणार, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील शाखा सुस्त

औरंगाबाद (अजय कुलकर्णी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात मान्सून दोन दिवस उशिराने येणार, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील शाखा सुस्त

अंफन चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा सध्या सुस्तावलेली आहे. तीन जूनपासून मान्सूनचे ढग कर्नाटकातील कारवार येथे अडकले आहेत. बंगालच्या उपसागरात जूनमध्ये याबाबत फारशी हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातेत मान्सून दोन ते चार दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत अाहे.

यंदा अंफन या भयंकर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वीच झाली. अंफन वादळानंतर अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ आले. त्यामुळे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. निसर्ग वादळामुळे मान्सून कर्नाटकाच्या कारवारपर्यंत पोहोचण्यास मात्र चांगली मदत झाली. आता अरबी समुद्रातील शाखा सक्रिय होण्यास कमी दाबाच्या क्षेत्राची गरज आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार एक ते तीन जूनपर्यंत देशात १०३% पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून सध्या स्थिर

सध्या मान्सून स्थिर आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत बदल अपेक्षित आहेत. त्यानंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील सात ते १० दिवसांत मान्सून महाराष्ट्र पार करून मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख-वेदर, आयएमडी, पुणे

0