आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैऋत्य मान्सून परतला:पाच महिन्यांच्या मुक्कामानंतर मान्सूनने राज्यातून घेतला निरोप, ईशान्य मान्सून दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयएमडीने या वर्षी मान्सूनच्या आगमन आणि प्रस्थानाचे नवे कॅलेंडर जाहीर केले होते

नैऋत्य मान्सून देशातून परतला असल्याचे बुधवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. त्याच वेळी ईशान्य मान्सूनचे आगमन झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यंदा जून ते ऑक्टोबर असा पाच महिने मान्सूनचा देशात मुक्काम राहिला.

आयएमडीने या वर्षी मान्सूनच्या आगमन आणि प्रस्थानाचे नवे कॅलेंडर जाहीर केले होते. मात्र या नव्या तारखांनाही मान्सूनने चकवा दिला. नव्या कॅलेंडरनुसार १५ ऑक्टोबर रोजी मान्सून देशातून परतणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तो २८ ऑक्टोबर पर्यंत मुक्कामी राहिला. आयएमडीनुसार, दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनचे आगमन झाले आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी,आंध्र प्रदेशच्या किनारी भागासह ईशान्य भारतात आता जोरदार पावसाची शक्यता आहे.

यंदा नगर, अकोला, मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबादेतून मान्सून ८ ऑक्टोबरला परतणे अपेक्षित होते. येथे मान्सूनने २० दिवस जास्त मुक्काम ठोकला. या काळात काही राज्यातील प.महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले.