आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Monsoon Update | Monsoon Arrives In Ahmednagar, Aurangabad; Favorable Conditions To Cover The Rest Of The State Including Mumbai In 48 Hours: Meteorological Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सून अपडेट:मान्सून अहमदनगर, औरंगाबादेत दाखल; 48 तासांत मुंबईसह उर्वरित राज्य व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती : हवामान विभाग

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 ते 17 जून या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

शनिवारी नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून आणखी प्रगती करत अहमदनगर, औरंगाबाद, गोंदियापर्यंत पोहोचला. शुक्रवारी मान्सून बारामती, बीड, वर्धा येथे दाखल झाला होता. हवामान विभागानुसार येत्या ४८ तासांत मान्सून मुंबईसह राज्य व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गुरुवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्राचा अहमदनगरपर्यंत भाग, मराठवाड्याचा औरंगाबादपर्यंतचा भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, छत्तीसगडचा काही भाग, ओडिशा व प. बंगालचा उर्वरित भाग, झारखंडचा बहुतांश भाग आणि बिहारच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

पुणे वेधशाळेनुसार १४ ते १७ जून या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यभर पावसाचा जोर

गेल्या २४ तासांत राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून आला. नाशिक, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नंदुरबार, धुळे, पुणे आदी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...