आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सून अपडेट:राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे; मराठवाडा-विदर्भात जोरदार

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक, नगर, जळगाव, सोलापुरात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, दक्षिण गुजरात व उत्तर महाराष्ट्रावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात येत्या आठवड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तीन जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

> ३ जुलै : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.

> ४ व ५ जुलै : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.

> ६ जुलै : मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार, तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस.

ऑरेंज अलर्ट (११५ ते २०४ मिमी पाऊस)

नाशिक, पुणे, मुंबई व विदर्भ 

यलो अलर्ट (६५ ते ११५ मिमी पाऊस)

धुळे, नंदुरबार, नगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद

ग्रीन अलर्ट (१५.६ ते ६४.४ मिमी)

औरंगाबाद, जालना, परभणी, सोलापूर, जळगाव

बातम्या आणखी आहेत...