आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राज्यात मान्सून अनलॉक:चार दिवस पावसाचे; राज्यात 17 ते 20 जुलै या काळात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा, यामुळे मान्सून सक्रिय

राज्यात बरीच शहरे लॉकडाऊन असताना मान्सून मात्र अनलॉक झाला आहे. पुन्हा सक्रिय होत मोसमी पावसाने गुरुवारी राज्यात सर्वदूर हजेरी लावली. राज्यात २० जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

१७ जुलै : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात काही जागी मुसळधार पावसाची शक्यता.

१८ व १९ जुलै : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस.

२० जुलै : मराठवाड्यात सर्वत्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार.

... यामुळे मान्सून सक्रिय : 

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे राज्यात आठवडाभर मान्सून सक्रिय राहील.