आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मान्सून अपडेट:राज्यात 4 दिवस पावसाचे, मान्सून पुन्हा सक्रिय होणार; 14 जिल्ह्यांत ऑरेंज, यलो अलर्ट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुलाबा वेधशाळेने 14 ते 17 जुलै या काळासाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट दर्शवला आहे

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास हवामान अनुकूल होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात राज्याच्या किनाऱ्यापासून ते केरळपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा व देशाच्या उत्तर भागात सक्रिय असलेला मान्सूनचा आस यामुळे १४ ते १७ जुलै हे चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दर्शवला आहे.

सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे, तर याचा पूर्व भाग हिमालयाच्या पायथ्याशी आहे. बिहार व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार

कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यात १४ ते १७ जुलै या काळात उत्तर महाराष्ट्र वगळता इतरत्र सर्वत्र पावसाचा जोर जास्त राहील. नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नाशिक, नगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

विदर्भ आणि मराठवाड्यात १४ ते १७ जुलै या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात या काळात चांगला पाऊस होईल. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांत जोर कमी राहील.

14 जिल्ह्यांत आॅरेंज, यलो अलर्ट : कुलाबा वेधशाळेने १४ ते १७ जुलै या काळासाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट दर्शवला आहे.

>ऑरेंज अलर्ट (११५.६ मिमी पेक्षा जास्त पाऊस) : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

> यलो अलर्ट (६४.५ ते ११५ मिमी) : नाशिक, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, व विदर्भातील जिल्हे

> ग्रीन अलर्ट (१५.५ ते ६४ मिमी) : नंदुरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, सोलापूर