आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सून अपडेट:राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार, सहा हवामान प्रणालींमुळे देशभर जलधारा

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधानगरीतून ४,२५६ क्युसेक विसर्ग, पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम - Divya Marathi
राधानगरीतून ४,२५६ क्युसेक विसर्ग, पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल सहा हवामान प्रणालींमुळे देशात सर्वदूर पाऊस होत आहे. महाराष्ट्रात या आठ‌वड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार सध्या देशात सर्वच भागांत मान्सून सक्रिय झाला असून यासाठी देशाच्या विविध भागांत निर्माण झालेल्या हवामान प्रणाली कारणीभूत ठरत आहेत. मान्सूनचा आस सध्या राजस्थानातील बिकानेर, ग्वाल्हेर, रांचीसह ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंतच्या स्थितीत आहे. देशभर पुरेशा पावसासाठी ही अनुकूल स्थिती मानली जाते. याशिवाय वायव्य राजस्थान, ईशान्य मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात भागात चक्रवात स्थिती आहे. मध्य भारतात पूर्व-पश्चिम असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातही असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता अाहे. या सहा हवामान प्रणालींमुळे देशभर सध्या पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत संततधार आहे.

राज्यात उघडीप शक्य

राज्यातील पावसाचा जोर कमी होऊन उघडीप शक्य आहे. मराठवाड्यात १५ मिमीपर्यंत, विदर्भात १५ ते २० मिमी, उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या पश्चिम भागात जास्त तर पूर्व भागात कमी, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण मध्यम राहील. काढणीस आलेल्या उडीद आणि मुगासाठी पावसात उघडीप आ‌वश्यक आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

पुणे वेधशाळेनुसार... राज्यात १९ ते २१ ऑगस्ट या काळात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

> १९ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

> २० ऑगस्ट : विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

> २१ ऑगस्ट : मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.

बातम्या आणखी आहेत...