आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:मान्सून विदर्भातून उत्तरेकडे सरकणार; राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, कोकणात ऑरेंज अलर्ट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गुजरात, विदर्भ, तेलंगण ते आंध्र प्रदेशचा किनारा असा असलेला मान्सूनचा आस येत्या दोन दिवसांत उत्तर भारतात सरकणार आहे. परिणामी राज्यातील पावसाचा जोर रविवारपासून ओसरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. दरम्यान, १६ ते १९ जुलै या काळात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवारी मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तो उत्तरेकडे सरकल्यास राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कच्छ व आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळत आहे. परिणामी दक्षिण व मध्य भारतात पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

कोकणात ऑरेंज अलर्ट
पुणे वेधशाळेनुसार, दक्षिण छत्तीसगड व पूर्व विदर्भावर चक्रीय चक्रवात स्थिती आहे. परिणामी राज्यात १६ ते १९ जुलै या काळात कोकण किनाऱ्यावर ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होईल.

बातम्या आणखी आहेत...