आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्हाळा:मे महिन्यात या वर्षी असतील सामान्यपेक्षा जास्त उष्णतेचे दिवस, होणार सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद

डॉ. सुषमा नायर वैज्ञानिक, प्रादेशिक हवामान केंद्र (मुंबई)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी मे महिन्यात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेचे दिवस असतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगण व किनारी गुजरातच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या अधिक असेल. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे 10 मे 2022 रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

या वर्षी मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तथापि, उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य भारतात तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहील. पण पूर्व-मध्य व पूर्व भारत, उत्तर पूर्व काही भागांमध्ये आणि द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. बहुतांश राज्यांमध्ये मे महिन्यातील किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

4 आणि 5 मे रोजी मराठवाडा विभागात जोरदार वाऱ्यासह पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ढगाळ आकाशामुळे ६ आणि ७ मे रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.