आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल सेव्हन फाउंडेशनच्या वतीने आमखास मैदान येथे १६ ते २२ डिसेंबरदरम्यान इग्नाइट एज्युकेशन एक्स्पो आयोजित केले आहे. जामिया कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सीईओ मौलाना हुजेफा वस्तानवी, मुनोवर जमा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तक प्रकाशकांची पुस्तके असून, १७० हून अधिक शैक्षणिक व साहित्य व पुस्तकांचे स्टॉल्स मांडण्यात आले.
पालक, विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन आणि करिअरवर मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये शनिवारी विविध विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आणि सांस्कृतिक उपक्रम घेण्यात येणार आहे. एक्स्पोच्या यशस्वितेसाठी मिर्झा सलीम बेग, अॅड. सय्यद फैज यांच्या मार्गदर्शनाखाली नुसरत खान, अब्दुल बासित सिद्दीकी, अफरोज खान, परवेझ खान, दानिश इक्बाल सिद्दिकी, मिर्झा कय्युम नदवी, अश्रफ अली, यासेर सिद्दिकी, शाहाब मिर्झा, नोमान सौदागर, नासेर जोहरी, परवीन सिद्दिकी, इरफान सौदागर, फारुख अहमद आदी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.