आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात १० जून नंतरही मोठ्या प्रकल्पांत ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी तसेच लांबलेल्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा चांगला आहे. जायकवाडीत सध्या ३४ टक्के पाणी आहे. मराठवाड्यात सिद्धेश्वर प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पांत जूनच्या पहिल्या आठवड्यांनंतरही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा फारशी पाणीटंचाई जाणवली नाही. जायकवाडीत सध्या एकूण उपयुक्त साठा ७४७ दलघमी तर एकूण पाणीसाठा १४८६ दलघमी (३४.४७ टक्के) आहे. निम्न दुधना प्रकल्पात १३९ दलघमी पाणीसाठा असून एकूण पाणीसाठा २४१ दलघमी आहे. दुधना प्रकल्पात ५७.४७ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ४३९ दलघमी (५४ टक्के) आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव प्रकल्पात ८६ दलघमी (२७ टक्के), मांजरा प्रकल्पात ५४ दलघमी (३० टक्के), ऊर्ध्व पैनगंगा ४६१ दलघमी (४७.८८ टक्के), मानार प्रकल्पात ३७ टक्के, निम्न तेरणा ५३ टक्के, विष्णुपुरी ४८ टक्के आणि सीना कोळेगावमध्ये २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांत २०५५ दलघमी पाणीसाठा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.