आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यापूर्वीच जायकवाडी धरणात तब्बल 34 टक्के पाणीसाठा:मराठवाड्यात 10 जूननंतरही 37 टक्क्यांपेक्षा अधिक साठा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात जुनच्या पहिल्या आठवड्यानंतरही मोठ्या प्रकल्पात 30 टक्यांपेक्षा आधिक पाणी साठा आहे. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी तसेच लांबलेला पावसाळा यामुळे धरणातील पाण्याचा साठा अजूनही शिल्लक आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात तब्बल 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाड्यात सिद्धेश्वर प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पात जुनच्या पहिल्या आठवड्यानंतरही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यतल्या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे फारसी पाण्याची टंचाई यावर्षी जाणवली नाही.

जायकवाडीत 34 टक्के पाणीसाठा

जायकवाडी धरणात सध्या एकुण उपयुक्त साठा 747 दलघमी इतका आहे. तर एकुण पाणीसाठा 1486 दलघमी इतका आहे. हे प्रमाण 34.45 टक्के इतके आहे. तर निम्न दुधना प्रकल्पात 139 दलघमी पाणीसाठा असून एकुण पाणीसाठा 241 दलघमी आहे. दुधना प्रकल्पात 57.47 टक्के पाणीसाठा आहे.तर येलदरी प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा 439 दलघमी इतका असून हे प्रमाण 54 टक्के इतके आहे.

तर सिद्धेश्वर प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. तर मांजलागव प्रकल्पात 86 दलघमी पाणी साठा असून 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मांजरा प्रकल्पात ५४ दलघमी (३० टक्के) उर्ध्व पैनगंगा 461 दलघमी( 47.88 टक्के) तर मानार प्रकल्पात 37 टक्क्के, निम्न तेरणा 53 टक्के, विष्णुपुरी 48 टक्के आणि सिनाकोळेगावनमध्ये 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातल्या अकरा मोठ्या प्रकल्पात 2055 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बातम्या आणखी आहेत...