आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी मासे विक्री:औरंगाबादेत एकाच दिवसात 50 टनांपेक्षा अधिक मासे विक्री

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी (७ जून) मासे खाल्ल्यानंतर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहते, असा समज असल्याने एकाच दिवसात तब्बल ५० टनांपेक्षा अधिक मासे विक्री झाले. शहरातील सेंट्रल नाका, मुकुंदवाडीसह विविध भागांत मासे घेण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी गर्दी केली होती. गेल्या वर्षी २५ टन मासे विक्री झाले होते. मात्र, यंदा त्या तुलनेत दुपटीने मासे विक्री करून दीड काेटीची उलाढाल झाल्याचे मुकुंदवाडीतील ठाेक मासे विक्रेते अन्सार शेख यांनी सांगितले.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला मासे खाल्ल्यानंतर वर्षभर निरोगी राहते, असा असल्यामुळे दरवर्षी ७ जूनला मोठ्या प्रमाणात मासे खरेदी केले जातात. ७ जूनला पावसाळा सुरू होतो. त्यानंतर मासे प्रजननाचा काळ असल्याने पुढील तीन महिने मासेमारी कमी होते. त्यामुळे मासेप्रेमी ७ जूनलाच मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करून खातात. सध्या शहरात तीन होलसेल मासे विक्रेते असून किमान दोनशे छोटे-मोठे व्यापारी मासे विक्री करतात. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी बाजारपेठेत मासे खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

गोड्या पाण्यातील माशाला अधिक मागणी : शहरात जिल्ह्यासह हैदराबाद व मुंबई येथून मासे विक्रीसाठी येतात. यात तलाव, नद्यांच्या गोड पाण्यातील रोहु, कटला, मरळ, वामसह विविध जातींचे मासे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. मुंबईतून पापलेट, बांगडा, सिंगाडा, झिंगा माशांना अधिक मागणी असल्याचे पाहायला मिळाले. बाजारपेठेत आलेल्या एकूण माशांपैकी ७० टक्के गोड्या पाण्यातील होते, तर ३० टक्क्यांपेक्षा कमी मासे खाऱ्या पाण्यातील म्हणजेच समुद्राच्या पाण्यातील आहेत, अशी माहिती विक्रेते अन्सार शेख यांनी दिली.

सात जूनच्या निमित्ताने दीड कोटीची उलाढाल, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विविध जातींचे मासे १६० ते १२०० रुपये किलाे नागरिकांकडून आवडीनुसार एकाच जातीचे मासे खरेदी केले जातात. यात कटला, रोहू, वाम, हलवा, सुरमई, मरळ, मिरगल, कोंबडा, आहेर, झिंगा, पापलेट, बांगडा, शिंगाड्यासह आदी ३० पेक्षा अधिक जातींचे मासे विक्रीसाठी आले आहेत. तसेच, मुंबईहून येणाऱ्या समुद्रातील माशांना मोठी मागणी असते. सध्या विविध जातींचे मासे १६० ते १२०० रुपये किलाेने विक्री होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...