आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात प्रवेशोत्सव:सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एक हजार जागांसाठी अडीच हजारांहून जादा अर्ज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उस्मानाबाद उपकेंद्रात पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने तीन टप्प्यांत सुरू केली आहे. यातील पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झाला असून ३ सप्टेंबर रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या दुसरा टप्पा असेल.या शाखेत एक हजार जागांसाठी अडीच हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून अतिरिक्त टेबलांचीदेखील व्यवस्था केली आहे. यात विद्यार्थ्यांना समुपदेशनासह मार्गदर्शनही करणार असल्याचे डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया १ सप्टेंबरपासून केंद्रीय पद्धतीने तीन टप्प्यात विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी ३,१३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यात इतर राज्य आणि इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडली. यात साडेचारशे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.

विद्यापीठाच्या एकूण प्रवेश क्षमतेपैकी इतर राज्यासह इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी इतर विद्यापीठांतील १० टक्के जागा पूर्ण भरल्या असून इतर राज्यांतील ७ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागा विद्यापीठातील पदव्युत्तर जागांत समाविष्ट केल्या आहेत.

सकाळी ८.३० वाजेपासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृहात सुविधा उपलब्ध करून दिल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठीच ही प्रवेश प्रक्रिया शनिवारी असेल. एक हजार जागांसाठी अडीच हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यानंतर कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या जागांसाठी ५ सप्टेंबर रोजी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. १० सप्टेंबर रोजी स्पॉट अॅडमिशन होतील, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

इतर विद्यापीठ कोट्यातील ९७ जागा रिक्तच
इतर विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमात २६१ जागा राखीव आहेत. त्यापैकी १६४ आणि इतर राज्यांसाठी राखीव २५३ पैकी १८ प्रवेश गुरुवारी निश्चित झाले. उर्वरित जागा या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येत आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्ससाठी पायपीट करावी लागत आहे. प्रवेशोत्सवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, नाष्ट्याची व्यवस्था वाजवी दरात करावी. प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांची धावपळ थांबवावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यापीठ समितीतर्फे प्र-कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...