आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवउद्योजक:अनाथ मुलांच्या सांभाळ, विवाहाची घेणार मोरया फाउंडेशन जबाबदारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवउद्योजक बनवण्यासाठी मोरया गणेश फाउंडेशन काम करणार आहे. तसेच अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करून त्यांच्या विवाहाचीही जबाबदारी घेणार असल्याचा संकल्प फाउंडेशनने केला आहे. या संस्थेचे उद्घाटन माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश मानकुसकर यांनी दिली आहे.

या उपक्रमांसंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत मानकुसकर बोलत होते. या वेळी प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके, ऋषिकेश मोरे, चंद्रकांत तौर, शुभम जाधव, प्रमोद सोळुंके, राहुल शेळके आदींची उपस्थिती होती. मानकुसकर म्हणाले, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोल्डन सिटी येथे फाउंडेशनचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड असतील. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...