आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:काॅम्प्युटर सायन्सच्या ८.७७ टक्के जागांवर बहुतांश विद्यार्थ्यांची नजर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आयआयटीने घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स २०२२ परीक्षेचा निकाल रविवारी (दि. ११) जाहीर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारपासून संयुक्त जागावाटप प्राधिकरणातर्फे (जोसा) कौन्सिलिंग सुरू होत आहे. पण, या कौन्सिलिंगमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष हे कॉम्प्युटर सायन्स (सीएस) या ब्रँचच्या जागांवर असेल. कारण आतापर्यंत अॅडव्हान्समध्ये उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष याच ब्रँचवर असते. त्यामुळे यंदा पात्र ठरणाऱ्या ४० हजार विद्यार्थ्यांमध्येही या शाखेच्या ८.७७ टक्के जागांसाठी मोठी स्पर्धा असेल.आयआयटीच्या २३ संस्थांमध्ये एकूण १६,५९८ जागा आहेत. यात कॉम्प्युटर सायन्सच्या १८९१ जागा आहेत. त्यातही मुंबई आयआयटीतील या शाखेच्या १७१ जागांवर गुणवंतांचे प्राधान्य असेल.

कटऑफ कमी होण्याची शक्यता
पूर्वी जाहीर केलेल्या कटऑफपेक्षा जेईई अॅडव्हान्स २०२० व २०२१ क्वॉलिफाइंग कटऑफ कमी करण्यात आले होते. जनरल कॅटेगरीसाठी विषयवार कटऑफ १०% तर अॅग्रीगेट कटऑफ ३५% जाहीर झाला होता. पण, अनुक्रमे तो ५% व १७.५% इतका घटवण्यात आला. या वर्षीही याचप्रमाणे क्वॉलिफाइंग कटऑफमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

..या आहेत प्रमुख आयआयटी
भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी) या देशातील सर्वाेत्कृष्ट संस्था मानल्या जातात. दिल्ली, कानपूर, मद्रास, खडगपूर व गुवाहटी आयआयटीत कॉम्प्युटर सायन्सच्या जागांसाठी मोठी स्पर्धा असेल. त्याशिवाय आयआयटी बीएचयू, इंदूर, हैदराबाद व रुडकीतही ‘सीएस’च्या जागांसाठी रस्सीखेच असेल. यामुळे जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या आजच्या निकालानंतर खरे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

प्रत्येकाला सहा गुण मिळणार बोनस
जेईई परीक्षेतील तज्ज्ञ देव शर्मा यांनी सांगितले, जाहीर झालेल्या प्रोव्हिजनल उत्तरतालिकानुसार, दोन शिफ्टच्या प्रश्नपत्रिकांमधून फिजिक्सचा प्रत्येकी एक-एक प्रश्न ड्रॉप करण्यात आला आहे. पेपर एकच्या सेक्शन ३ मध्ये १५ वा प्रश्न तर पेपर दोनच्या सेक्शन ३ मधील १७ वा प्रश्न आहे. या प्रश्नांचे गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. दोन्ही प्रश्न ३-३ मार्कांचे आहेत. त्यामुळे सर्वच परीक्षार्थींना सहा मार्क हे बोनस मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...