आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत नोंदवला सहभाग:बहुतांश विद्यार्थ्यांनी सुचवले कृषीवर आधारित अभ्यासक्रम

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे कृषीला चालना देणारे रोजगार आणि स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होणे आवश्यक आहे. आज अनेकांना शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी याची माहिती नाही. शहरी मुलांना गांडूळखत निर्मिती, सेंद्रिय शेती, सिंचन पद्धतीत रस नाही. हवामान बदलामुळे होणाऱ्या अतिपावसामुळे माती वाहून जाते आहे. तेव्हा माती परीक्षणसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असावा, असे एकाहून एक कल्पक विचार विद्यार्थ्यांनी “सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ यावर आयोजित स्पर्धेत मांडले. जिल्हास्तरावर १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धा घेण्यात आली.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या हेतूने त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम उपलब्ध व्हावे. त्यासाठी १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत “सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम ‘ स्पर्धेचे आयोजन केले होते. यात शेती व्यवसाय, स्वयंरोजगार, महिला रोजगार, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आदी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबाद विभागातून एकूण २९५१० विद्यार्थी सहभागी झाले होते, तर औरंगाबादमधून १२०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

बदनापूर येथील विद्यार्थ्याने हवामान बदलामुळे योग्य निर्णय न घेतल्याने पिके वाया जातात. अति पावसामुळे माती वाहून जाते. यासाठी माती परीक्षण तर कमी पाण्यातही चांगले पीक घेता येऊ शकते याची पद्धती, गांडूळ खत कसे तयार करतात याची सविस्तर माहिती असलेला विषय अभ्यासक्रमात असावा असे मत मांडले. यात बदनापूर आयटीआयमधून प्रथम वरद सोनुने, द्वितीय शुभांगी चव्हाण, तृतीय पवन साळवेची निवड झाली आहे.

शेतीसंबंधी नवीन विषय विद्यार्थ्यांनी सुचवले शेतीसंबंधी बहुतांश विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये असावेत असे मत मांडले. त्याचे उत्तम सादरीकरणही केले. विद्यार्थिनींनी ज्वेलरी डिझायनिंग, फूड प्रोसेसिंगसंबंधी वेगळे अभ्यासक्रमातून स्वयंरोजगारावर कसा भर दिला जाईल हे स्पष्ट केले. स्पर्धेच्या निमित्ताने मुलांमधील आत्मविश्वास आणि संवादकौशल्यही दिसून आले. देविदास राठोड, प्राचार्य, आयटीआयस बदनापूर

बातम्या आणखी आहेत...