आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक घटना:शॉटसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू, माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगावची घटना

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामस्थ मदतीसाठी धावले पण, आग वाढल्याने कुणीच काही करू शकले नाही

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव परिसरात रविवारी ( दि .23 ) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.

​​​​ सखुबाई शंकरराव फफाळ ( वय 65 ) व त्यांची मुलगी शशिकला शंकरराव फफाळ ( वय 45 ) अशी मयतांची नावे आहेत. अचानक घरात झालेल्या शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत दोघींचाही होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती पुंडगे , उपनिरीक्षक निलेश इधाटे , कर्मचारी राठोड यांनी धाव घेत . पंचनामा सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील विद्युत प्रवाहाची तार कट होऊन करंट पत्रात उतरला होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शशिकला फपाळ या बाहेरून दूध घेऊन घरात आल्या. यावेळी त्यांचा स्पर्श घराच्या पत्राला झाल्याने त्या चिटकल्या. हे त्यांची मुलगी सखुबाई फपाळ यांनी पाहताच आईला वाचवण्यासाठी जवळ गेल्याने त्याही चिटकल्या. दोन्ही मायलेकीच्या अंगात विद्युतप्रवाह उतरलेला असताना अचानक संपूर्ण घरालाच आग लागली. ग्रामस्थ त्यांना वाचवण्यासाठी धावले. परंतु तोपर्यंत आगीने घराला वेढले. या दुर्घटनेत वरील दोन्ही मायलेकीचा जागीच कोळसा होऊन मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...