आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:आईला मारहाण, बापावर मुलाने झाडल्या गोळ्या; एक गोळी घुसली पोटात

आष्टी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यातील आष्टी येथील घटना

पत्नीवर रिव्हॉल्व्हर रोखत तिला जिवे मारण्याच्या तयारीत असताना माजी सैनिक असलेल्या बापाच्या हातातून अचानक रिव्हॉल्व्हर खाली पडले. हे पाहून मुलाने ते उचलून बापावर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी हुकली. परंतु दुसरी गोळी पोटात घुसल्याने बाप जखमी झाल्याची घटना आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात गुरुवारी वाजता घडली.माजी सैनिकास उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.

माजी सैनिक संतोष किसन लटपटे पत्नीला लिमटाका गणपती चौकात दारूच्या नशेत मारहाण करत घरी गेले. घरी त्यांनी पत्नीला मारहाण सुरूच ठेवली. तुला आता गोळ्या घालतो असे म्हणत त्यांनी पत्नीवर बंदूक रोखली. इतक्यात हातातील बंदूक खाली पडली. हे पाहून मुलगा किरण याने बंदूक उचलून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी हुकली व दुसरी संतोष लटपटे यांच्या पोटात घुसली. किरणही नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष यांना नगर येथे हलवले आहे. माजी सैनिक लटपटे यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा अधिकृत परवाना आहे. आईला नेहमी मारहाण करत असल्यामुळे रागाच्या भरात आपण गोळ्या झाडल्याची कबुली मुलाने दिली आहे.

दरम्यान, पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार घडला तेंव्हा मुलगा नशेत हाेता. अाईला मारहाण हाेत असल्याचे पाहून त्याने सरळ बापावरच हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...