आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाड:बंधाऱ्यात कार पडून सासू-सासरे,सुनेचा मृत्यू, करमाडजवळच्या जडगाव येथील दुर्घटना

करमाड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालकाचा ताबा सुटल्याने कार कोल्हापुरी बंधाऱ्यात पडून कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जडगाव (ता. औरंगाबाद) येथील नातेवाइकांना भेटून पुढे एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात असताना मंगळवारी दुपारी अडीच वाजता जडगावजवळ ही घटना घडली. वैजिनाथ उमाजी चौधरी (५२), मंगल वैजिनाथ चौधरी (४५) व सुकन्या मधुर चौधरी (२२, रा. सर्व सेलूद, ता. औरंगाबाद ह. मु. गजानननगर, औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वैजिनाथ चौधरी हे आपली कार (एमएच १४ एक्स ९६५८) ने आपली पत्नी व सुनेला घेऊन दर्शनासाठी एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जडगाव येथील नातेवाईक राजेंद्र वाघ यांना भेटून पुढे एकलहरा येथे जाण्याचा बेत ठरवला. लाडगावहून जात असताना जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ चौधरी यांचा कारवरील ताबा सुटून कार बंधाऱ्यात पडली. त्यांनी मोबाइलद्वारे नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद पडला.

या बंधाऱ्यात जवळपास ३०-४० फूट पाणी खोल असल्याने कारचा शोध घेण्यास अडचण येत होती. या वेळी अग्निशमन दलाचे २५ जवान व गावकऱ्यांनी पाच तास अथक प्रयत्न करून सायंकाळी पावणेसात वाजता क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढली.

बंधाऱ्याला सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना नाहीत : लाडगावमार्गे जडगावला जात असताना गावात प्रवेश करतेवेळी या बंधाऱ्याला अर्धा किलोमीटर वळसा घालून गावात प्रवेश करावा लागतो. परंतु, बंधाऱ्याच्या काठावरून जात असताना या ठिकाणी तारेचे किंवा भिंतीचे कंपाउंड करण्यात आले नसल्याने ही भीषण दुर्घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...