आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेम जुळल्यानंतर दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. प्रेमवविाहात हुंडा आला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. तेव्हा मुलीच्या सुखासाठी वडिलांनी पंधरा लाख देण्याचे अश्वासन देत १३ लाख दिलेदेखील. मात्र, अवघे दोन लाख बाकी आहेत म्हणून पुन्हा छळ सुरू केला. यास कंटाळून सात महिन्यांची गर्भवती असलेली वर्षा दीपक नागलोत (३०, रा. गजानन कॉलनी, गारखेडा) हिने शुक्रवारी संध्याकाळी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ती एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होती.
मी बहिणीच्या खोलीत जाईपर्यंत तिला रुग्णालयात घेऊन गेले...
घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांत सासरच्या मंडळींनी वर्षाच्या घरी फोन केला. ती बेडरूमचे दार उघडत नाही, असा निरोप दिल्यामुळे तिचा भाऊ शुभम जारवालने तत्काळ तिचे घर गाठले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठ वाजता मी घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा सासरच्यांनी वर्षाला गळफासावरून उतरवले होते. एवढ्या घाईतही मला त्यांनी तिच्या रूममध्ये पाठवले. मी पहिल्या मजल्यावरील खोलीत जाईपर्यंत त्यांनी वर्षाला रुग्णालयात नेले. खोलीतील सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. मी खाली आलो तेव्हा सगळे गाडीत बसून जात होते. मीदेखील त्यांच्या पाठीमागे गेलो. तिला खासगी रुग्णालयातून घाटीत पाठवल्याचे कळाले. मी घाटीत पोहोचलो तेव्हा तिला सोडून सगळे पसार झाले होते. त्यांचा जावई कार सोडून निघून गेला होता. अजूनही तिच्या जविाचे काही वाईट झाले नसेल ही आशा होती. मात्र, डाॅक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगताच पायाखालची जमीन सरकली. काय करावे सुचत नव्हते. तिच्या सासरचे त्या ठिकाणी कोणीच नव्हते. अखेर जड अत:करणाने गावाकडील आई-बाबांना ही माहिती दिली.
वर्षाचे सासर श्रीमंत, गजानननगरात मोठा बंगला
वर्षा आणि दीपक नातेवाईकच होते. २०१२ मध्ये वर्षा शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन दीपकशी लग्न केले. दीपकचे कुटुंब मात्र मुलाच्या लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून नाराज होते. लग्न होताच तिचा छळ सुरू झाला. ही बाब वर्षाच्या वडिलांना कळताच त्यांनी हुंडा देण्याचे कबूल केले. नातेवाइकांच्या बैठकीत १५ लाख देण्याचा निर्णय झाला. सासरच्या मंडळींनी हुंड्याची अर्धी रक्कम म्हणजे सात लाख मिळेपर्यंत वर्षाला माहेरी जाऊ दिले नाही.
सासर श्रीमंत, गजानन नगरात बंगला
विशेष म्हणजे लग्नानंतरही माहेरी राहणाऱ्या नणंदेने वर्षाला टोमणे मारले. पहिल्याच बैठकीत वर्षाच्या शेतकरी वडिलांनी पाच लाख रुपये दिले. पुढचेही टप्प्याटप्प्याने देतो, मात्र माझ्या लेकीला त्रास देऊ नका अशी विनंती केली. आतापर्यंत वर्षाच्या वडिलांनी १२ लाख ६० हजार रुपये सासरच्यांना दिले होते. फक्त दोन लाख बाकी होते तरीही तिचा छळ सुरू होता. तिचे सासर श्रीमंत आहे. गजानननगरात त्यांचा बंगला आहे. सासरा मोठा ठेकेदार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.