आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारण समोर:पत्नीस नांदण्यास न पाठवल्याने संपवले सासूला, खूनी जावई फरारच, साथीदार पुतण्याला पोलिस कोठडी

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील साळेगाव येथे जावयाने धारदार कोयत्याने वार करून सासूचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या घटनेमागचे कारण समोर आले असून माहेरी असलेल्या पत्नीस नांदण्यास न पाठवल्याच्या कारणावरून जावयाने सासूला संपविले आहे.

जावयासोबत असलेल्या त्याच्या पुतण्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

साळेगाव येथील आरोपी अमोल वैजनाथ इंगळे याची पत्नी दोन महिन्यापूर्वी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. तिला सासरी नांदण्यास पाठविण्याचा आग्रह जावई अमोल इंगळे याने सासू लोचना माणिक धायगुडे ( वय ४५, रा. धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई ) यांच्याकडे धरला होता. त्यामुळे जावायाला समजावून सांगण्यासाठी लोचना धायगुडे ह्या त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे ( वय २९ ) याला घेऊन ते दोघे रविवारी सकाळी दुचाकीवरून साळेगाव येथे आले होते. दुपारी १२ वाजता केज - कळंब रस्त्यावरील साळेगावजवळील दिलीप मेडकर यांच्या संताजी हॉटेलसमोर जावई अमोल इंगळे हा त्यांना भेटला. पत्नीला नांदण्यास पाठविण्यावरून त्यांच्या भांडण सुरू झाले. मात्र अगोदर चिडलेल्या अमोल इंगळे याने त्याचा पुतण्या प्रशांत बबन इंगळे याला सोबत घेऊन हातात कोयते आणि खिशात मिरची पूड घेऊन तयारीत आला होता. भांडण सुरू होताच त्यांनी डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयत्याने हल्ला करीत सासू लोचना यांच्या मानेवर व गळ्यावर वार केल्याने सासू जाग्यावर मरण पावली. तर चुलतीला वाचविण्यासाठी पुढे आलेला अंकुश धायगुडे याच्या हातावर कोयत्याचे वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अमोल इंगळे हा घेऊन गेलेली दुचाकी सोनीजवळा येथे पोलिसांना मिळाली. चुलता पुतण्याने केला कट या प्रकरणी अंकुश धायगुडे यांची फिर्याद नोंदवून घेत आरोपी अमोल इंगळे, त्याचा पुतण्या प्रशांत बबन इंगळे या दोघांविरुद्ध केज पोलिसात खुनाचा दाखल केला आहे. दोघांनी मिळून अमोल याच्या सासूच्या खूनाचा कट केला होता. जावई फरार, पुतण्या अटक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अमोल इंगळे याचा पुतण्या प्रशांत इंगळे याला गावातून अटक केली. त्याला केज येथील न्यायालयासमोर हजर केले असता प्रशांत इंगळे यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अमोल इंगळे हा मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...