आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका सासुने आपल्या जावायाला किडनी दान करून त्याला एकप्रकारे जीवनदानच दिलंय. माजलगाव येथे ही घटना घडली आहे. ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रकिया कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली आहे.
माजलगाव येथील 47 वर्षीय रूग्ण किडनी आजाराने ग्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. तेव्हापासून रुग्ण डायलिसीसवर होता. किडनी रोगावर उपचार घेण्यासाठी खूप ठिकाणी फिरला पण त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. किडनी प्रत्यारोपित करण्यासाठी तो रूग्ण प्रयत्न करू लागला.
पण कुटुंबातील ' कोणीही योग्य किडनी दाता नसल्याने त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला होता. अशा कठिण परिस्थितीत रूग्णाच्या सासू किडनी दानासाठी तयार झाल्या. तपासणी अंती त्यांच्या सासू योग्य दाता ठरल्या. परंतू त्यांचा रक्तगट जुळला नसल्यामुळे प्रत्यारोपण करणे कठिण होते.
किडनी प्रत्यारोपण शस्त्रकिया
परंतू कमलनयन बजाज हॉस्पिटल येथिल किडनी विकार तज्ञ डॉ. समीर महाजन यांनी वेगवेगळे रक्तगटाच्या किडणी प्रत्यारोपण करण्याचे कठिण आवाहन स्विकारले. रुग्ण व मुत्रपिंड दाता या दोघांचे रक्तगट वेगळे असतांना देखील वैद्यकिय क्षेत्रातील प्रगतीमुळे रक्तगट न जुळणाऱ्या दात्याचे मुत्रपिंड सुध्दा रुग्णामध्ये प्रत्यारोपण केले जाऊ शकते. हे सांगितल्यावर रुग्ण हे किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी तयार झाला. गुंतागुतीची व वेगवेगळे रक्तगट असलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रकिया कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ समीर महाजन, मुत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ अजय ओसवाल व डॉ. राजेश सावजी, भुलतज्ञ डॉ. सचिन नाचणे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.