आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईची नदीत उडी; दोघांचाही बुडून अंत

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • संगम जळगावातील हृदयद्रावक घटना

कपडे धुताना सोबत नेलेला पाच वर्षांचा चिमुरडा नदीपात्रात गेला. तो बुडत असल्याचे पाहून आईने पाण्यात उडी घेत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मात्रमायलेकरांचा बुडून अंत झाल्याची घटना मातृदिनाच्या रविवारी संगम जळगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथे सकाळी ९च्या दरम्यान घडली.

पल्लवी गोकुळ ढाकणे (२६) रविवारी सकाळी ९ वाजता कपडे धुण्यासाठी गोदावरी पात्रात मुलगा समर्थला (५) घेऊन गेल्या होत्या. समर्थ खेळता खेळता नदीपात्रात गेला. खड्डा असल्याने तो बुडू लागला. पल्लवी यांनी काेणताही विचार न करता पात्रात उडी घेतली. मात्र, मुलगा समर्थ व त्या स्वत: बुडून मरण पावल्या.

बातम्या आणखी आहेत...