आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दोन मुलींसह विष घेतले; आईसह एकीचा मृत्यू, एक बचावली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विष का घेतले याचे कारण अद्याप समोर आले नाही

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील आईने दोन भोळसर मुलींसोबत आपल्या स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. या घटनेत आई व एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी बचावली. आई व दोन्ही मुलीने विष का घेतले याचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा तपास खुलताबाद पोलिस करत आहेत.

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील जनाबाई अण्णा मांदडे (६५) व त्यांची सर्वात मोठी मुलगी हिराबाई अण्णा मांदडे (४०) तसेच तीन नंबरची मुलगी राधाबाई मनोज आढाव (३५) या तिघी शनिवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी पळसवाडी येथून आपल्या शेत गट क्र. २७६ मध्ये गेल्या होत्या. तिघींनीही सर्व बकऱ्या एका झाडाला बांधून विष घेतले. यात आई जनाबाई व तीन नंबरची मुलगी राधाबाई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर मोठी मुलगी घटनास्थळी बसून होती. जनाबाई यांचा मुलगा गोकुळ मांदडे हा सकाळी दहाच्या सुमारास शेतात गेला असता आई व एका बहिणीचा मृत्यू झाल्याचे त्याला दिसून आले.

परिसरात उलटसुलट चर्चा : जनाबाई व त्यांच्या मुलींनी विष घेतले या घटनेत आई व एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी बचावली आहे. या प्रकरणी पळसवाडी परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. काही जणांच्या तोडून जनाबाईच्या दोन्ही मुली भोळसर आहेत. दोन्ही मुलींपैकी एका मुलीसोबत काहीतरी अनुचित घटना घडलेली असावी. बकऱ्या चारताना कोणीतरी व्यक्तीने एका भोळसर मुलीसोबत गैरकृत्य केले असावे. यामुळे आई जनाबाईने स्वत: विष घेऊन दोन्ही मुलींना विष पाजले असावे अशी चर्चा अाहे. दरम्यान, या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय ठोंबरे, रमेश भिसे, पोलिस अंमलदार मनोहर पुंगळे, मनोहर छत्रे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...