आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मिक बालविकास सेवा:स्तनपानएवढाच मातांचा आहार महत्त्वाचा : डॉ. मंजूषा शेरकर

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळाला आजार होऊ नये यासाठी बाळ जन्मल्यापासून पहिल्या एका तासात मातेचे दूध मिळाले पाहिजे हेच त्याचे पहिले लसीकरण असते. नियमित स्तनपान केल्यास मातेचे आरोग्य निरोगी राहते. त्यासाठी मातेच्या आहारालासुद्धा महत्त्व दिले पाहिजे, असे मत डॉ. मंजूषा शेरकर यांनी व्यक्त केले.

गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूजच्या सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा योजना, वुमन डॉक्टर विंग आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांसाठी जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपान आणि मातेचा आहार विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य मार्गदर्शक डॉ. मंजूषा शेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, डॉ. सचिन फडणीस, डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. रश्मी बोरीकर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका चित्रा खोचे, प्रतिभा परदेशी, मिथिन चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुनील सुतावणे यांनी १५ ऑगस्टपासून अंगणवाडी सेविकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण सुरू करण्याचे घोषित केले. स्वाती धुमाळ यांनी सूत्रसंचालन तर शिल्पा गवांदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...