आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:इम्पिरिकल डेटा संकलन पद्धतीविरोधात आंदोलन ; बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इम्पिरिकल डेटा गोळा गोळा करण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. मात्र आयोगाच्या वतीने ओबीसींची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते. मात्र माहिती संकलित न करता आडनावानुसार सदोष माहिती संकलित केली जात असल्यामुळे हे आंदोलन केल्याची माहिती ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी दिली.

ओबीसींची जनगणना ही आडनावावरून न करता प्रत्येक घरी जाऊन घरात जाऊन करावी, सद्यःस्थितीत सुरू असलेल्या पद्धतीनुसार ओबीसींची फसवणूक केल्यामुळे जबाबदार व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे अनिवार्य आहे. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंदा ढोके, सुरेश बनसोड, अप्पासाहेब निर्मळ, विठ्ठल जाधव, संतोष विरकर, निशांत पवार, संदीप घोडके, चंद्रकांत पेहरकर, प्रकाश दिलवाले, साळुंबा पांडव, अशोक भवर, ज्ञानेश्वर गोरे, लक्ष्मण हेकडे, ज्ञानेश्वर जेजूरकर, शिवाजी जाधव, संजय सूर्यवंशी, संजीवन घोडके आदी उपस्थित होते.

घोडके म्हणाले, सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे गावंढळपणा आहे. त्यामुळे ओबीसींचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...