आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:दलित पँथरतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन ; घरकुल योजनेत नवीन बेघर लाभार्थींची नावे टाका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान घरकुल योजनेत नवीन बेघर लाभार्थींची नावे समाविष्ट करा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय दलित पँथरच्या वतीने सोमवारी मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांना निवेदन दिले. घरकुल योजनेत नवीन बेघर लाभार्थींची नावे समाविष्ट करा, शहराला तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, कामगार भरतीतील एक व दोन वर्षे मनपात काम केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या, सिडको एन-७ येथील अरुण गावंडे यांच्या घरासमोरील अतिक्रमण काढावे, महिला बचत गटांना मनपाची कामे द्यावी आदी मागण्या केल्या. आंदोलनाचे नेतृत्व दलित पँथरचे अध्यक्ष लक्ष्मण भुतकर, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश पवार, सचिव दिलीप पवार, दशरथ कांबळे, ॲड. सतीश राऊत यांनी केले. या वेळी गीताबाई म्हस्के, पार्वतीबाई घोरपडे, सुभद्राबाई कासारे, प्रभाकर वक्ते, कावेरी ससाणे, रुक्मिणीबाई आगळे, मंगलबाई साळवे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...