आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक:हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्सचा फायनलमध्ये प्रवेश, प्रदीप जगदाळेचे शतक

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सवातर्गंत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य लढतीत हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारी आमखास मैदानावर झालेल्या लढतीत हायटेकने एम्पायर स्टेट संघावर 61 धावांनी मात केली. शतकवीर प्रदीप जगदाळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हायटेकने 20 षटकांत 2 गडी गमावत 196 धावांचा डोंगर उभारला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रवीण देशेट्टी भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवर तथा कर्णधार प्रदीप जगदाळेने संघाची धुरा आपल्या खाद्यांवर घेत स्पर्धेतील पहिले शतक ठोकले.

प्रदीपने 65 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांची बरसात करत नाबाद 114 धावांची खेळी करत, यावेळी उपस्थित असलेल्या हजारो क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्याला साथ देत मो. आमेरने अर्धशतक झळकावले. एम्पायरने प्रदीपची स्फोटक फलंदाजी रोखण्यासाठी त्यांनी 8 गोलंदाज वापरले, मात्र तरी त्यांना यश आले नाही. प्रदीप व आमेर जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 116 चेंडूंत 181 धावांची दिडशतकी भागीदारी रचली. आमेरने 51 चेंडूंत 7 सणसणीत चौकार खेचत 59 धावा ठोकल्या.

मोहसिन खानने सय्यद तल्लाहच्या हाती त्याला झेल बाद केले. ऋषीकेश नायरने 3 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद 14 धावा काढल्या. एम्पायरकडून सय्यद तल्लाह आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

विकास, ऋषीकेश, मुसाची भेदक गोलंदाजी

प्रत्युत्तरात एम्पायर स्टेट संघाचा डाव 18. 4 षटकांत 135 धावांवर संपुष्टात आला. ग्रामीण पोलिसचा खेळाडू असलेल्या फिरकीपटू विकास नगरकरने 3 बळी घेत एम्पायरच्या फलंदाजांवर लगाम लावली. सलामीवीर कर्णधार शेख मुकिमने 21 चेंडूंत 4 चौकारांसह सर्वाधिक 30 धावा काढल्या.

दुसरा सलामीवीर आदर्श जैन 8 धावांवर परतला. सय्यद फरहानने 14, ऋषिकेश पवारने 16, मो. वसिमने 25 धावांचे योगदान दिले. संदीप सहानीने 11 व सय्यद सादिकने 13 धावा जोडल्या. हायटेककडून ऋषीकेश नायरने 28 धावा देत 2 आणि मुसा पटेलने 29 धावा देत 2 गडी बाद केले. इम्रान व नैफने प्रत्येकी एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...