आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुवा फाउंडेशन आयोजित खासदार चषक:बॅटको युनायटेडचा शानदार विजय; बाबा बिल्डरला अवघ्या एका धावेने हरवले

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयजे क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत बॅटको युनायटेड संघाने रोमांचक विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या लढतीत बॅटकोने बाबा बिल्डर्स संघाला अवघ्या 1 धावेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या लढतीत अष्टपैलू मो. इम्रान (28 *धावा, 2 बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना बॅटकोने 15 षटकांत 8 बाद 100 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेख सादिकने 13 चेंडूंत 13 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर स्वप्निल खडसे 6 धावांवर आल्यापावली परतला. नौशाद हाश्मी भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर आलेल्या अजय काळेने 19 चेंडूंत २ चौकारांसह 18 आणि अनिकेत काळेने एका षटकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. अभिजीत साळवेने 15 धावा जोडल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार मो. इम्रानने फटकेबाजी करत 19 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 28 धावा ठोकल्या. हरमितसिंग रागी 3 धावांवर परतला. शेख आरिफ शुन्यावर बाद झाला. बाबा संघाकडून शेख अल्ताफने 12 धावांत 2, सय्यद परवेजने 11 धावांत 2 आणि विनायक भोईरने 17 धावांत 2 गडी बाद केले. अब्दुल समी व जावेद चांदने प्रत्येकी एकाला टिपले.

सलमान, विनायकचे प्रयत्न अपुरे पडले

प्रत्युत्तरात बाबा बिल्डर्स संघ निर्धारित षटकांत 8 बाद 99 धावा करु शकला. महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने संघाचा पराभव झाला. सलामीवीर आकाश बोर्डे 7 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार सलमान अहेमदने एक बाजू लावून धरत 18 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार लगावत सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. कय्युम 5 व आदित्य राजहंस 2 धावांवर परतले. विनायक भोईरने 32 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले. वसिम खान (9) व अदनान अहेमद (2) मोठी खेळी करु शकले नाहीत. बॅटकोकडून मो. इम्रानने 17 धावा देत 2, हरमितसिंग रागीने 11 धावांत 2 आणि विजय ढेकळेने 17 धावा देत 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...