आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांची अपेक्षा

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील हळदीला देशात प्रथम पसंती मिळावी याकरिता खासदार हेमंत पाटील मोठे काम करीत आहेत. हळद संंधोन व प्रक्रिया केंद्राबाबत केवळ मराठावड्यापुरता विचार न करता संपूर्ण राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करून त्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच दर्जेदार हळद उत्पादन ही महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २७) हिंगोली येथे व्यक्त केली आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळाच्या समितीच्या अभ्यासाबाबत माहिती घेतली. खासदार हेमंत पाटील यांनी विजयवाडा येथील बैठकीत मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळाची स्थापना करावे अशी मागणी केली होती. मराठवाड्यात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते पण त्याचे योग्य विपणन व वितरण होत नाही ही बाब केंद्र शासनाच्याही लक्षात आणून दिली होती. त्यानंतर शासनाने खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांना देण्यात आली.

यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी खासदार पाटील यांच्या कामाचे कौतूक करून त्यांनी केवळ मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विचार न करता संपूर्ण राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून त्यादृष्टीने काम करावे. त्यातून राज्यात पिकविली जाणारी उच्च प्रतिची हळद देशातील इतर भागात निर्यात करण्यास मदत होईल. त्यातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. तसेच हिंगोली जिल्हयात हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन होणार असल्याने हिंगोली जिल्ह्याला नवीन ओळख प्राप्त होणार आहे. खासदार पाटील शेतकऱ्यांचे हित जोपासणारे व्यक्तीमत्व असून त्यांनी महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...