आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ब्रेकिंग न्यूज:खासदार इम्तियाज जलील यांची ताब्यात घेऊन सुटका, 'मशीदीत जाण्यापूर्वीच घेतले होते ताब्यात

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जलील यांना मशीदीत जाण्यापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी कमिश्नर ऑफिसमोर गोंधळ घातल्यानंतर चार वाजता त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी मशीद उघडून नमाज अदा करण्याची घोषणा केली होती.

जलील यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्ते कमिश्नर कार्यालयासमोर
खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येत त्यांचे कार्यकर्ते कमिश्नर कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ आणि वाढती घोषणाबाजी पाहता बुधवारी दुपारी अडीच वाजता ताब्यात घेतलेल्या जलील यांची चार वाजता सुटका करण्यात आली.

इम्तियाज जलील यांना पोलिसांनी नमाज अदा करण्यासाठी जातानाच ऐनवेळी अडवले. यावेळी पोलिसांशी बोलताना जलील म्हणाले, आताच आम्ही लोकांना अपील केले की शांतता राखा. आता नमाज अदा करण्यासाठी जात आहोत. आम्ही शांततेने नमाज अदा करण्यासाठी जात आहोत. आमच्यासोबत 25 पेक्षा कमी कार्यकर्ते आहेत. फक्त 5-7 मिनिटे द्या. आम्ही नमाज अदा करू आणि निघून जाऊ."

पण पोलिसांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. सरकारी नियम आहेत त्यानुसार ही कारवाई केली जात आहे असे पोलिसांनी म्हटले. त्यावर आम्ही सुद्धा सरकारला हेच सांगण्यासाठी आणि अपील करण्यासाठी करत आहोत असे जलील म्हणाले. यानंतर त्यांना अटक करून नेण्यात आले. त्यांच्यासोबत एमआयएमचे नगरसेवक आणि मागच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार नासेर सिद्दीकी सुद्धा होते. त्यांना देखील जीपमध्ये बसवून नेण्यात आले आहे.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ ही बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. मात्र आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याचे म्हणाले होते.

0