आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत मेट्रो नको, फ्लायओव्हर करा:खासदार इम्तियाज जलील यांचा लोकसभेत पुनरुच्चार, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कारवाईचीही मागणी

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील आज लोकसभेत औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात निकृष्ट दर्जाच्‍या रस्त्यांची चौकशी करण्‍याची आणि अनेक वर्षापासून रखडलेले प्रलंबित रस्ते त्वरीत पूर्ण करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आणि केंद्रीय मार्ग निधीतुन औरंगाबाद जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत दर्जा आणि गुणवत्तेबाबत तांत्रिक तपासणी करुन संबंधित अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणीही त्‍यांनी केली.

मेट्रो नको, फ्लायओव्हर करा
औरंगाबाद शहराला मेट्रो लाईनची गरज नसून सद्यस्थितीत जालना रोडवर नगर नाका ते चिकलठाणा अखंड उड्डाणपूल (फ्लायओव्हर) मंजुरी देण्यात यावी तसेच औरंगाबाद ते शिर्डी सुपरएक्सप्रेस तयार करावा अशी मागणी केली. शहरात मेट्रोच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, शहराला सध्या मेट्रोची गरज नसल्याचे म्हणत, खासदारांनी यावर आक्षेप घेतला होता. याचा पुनरुच्चार करत त्यांनी जालना रोडवर लवकरात लवकर फ्लायओव्हर करण्याची मागणी लोकसभेत केली आहे.

औट्रम घाटचा प्रश्न मांडला
औरंगाबाद – सिल्लोड - अजिंठा महामार्गाचे काम त्वरीत पूर्ण करावे, औरंगाबाद पूणे एक्सप्रेसवे आणि कन्नड येथील औट्रम घाटचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...