आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेत्यांना कोरोना:खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग, याआधी 3 ऑगस्टला झाली होती लागण

नांदेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 ऑगस्टला पॉझिटिव्ह, मुंबईत उपचारांनंतर झाले होते बरे
  • संसद अधिवेशनाच्या आधी घेतलेल्या काेरोना चाचणीत बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव हेही पॉझिटिव्ह आढळले

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दीडच महिन्यात दुसऱ्यांदा काेरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गेलेल्या चिखलीकर यांची सोमवारी कोरोना चाचणी झाली. अहवाल पॉझिटिव्ह आला.

३ ऑगस्ट रोजी खा. चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली होती. औरंगाबादच्या एमजीएमच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर वैद्यकीय चाचणीत ते निगेटिव्ह आले होते. त्यानंतर ते काही दिवस होम क्वाॅरंटाइन राहिले होते. तब्येत ठणठणीत झाल्यानंतर ते २२ ऑगस्टला नांदेडला आले.

खा. प्रताप जाधवही पॉझिटिव्ह

दिल्लीत संसद अधिवेशनाच्या आधी घेण्यात आलेल्या काेरोना चाचणीत बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव हेही पॉझिटिव्ह आढळले आहेत. खासदारांच्या कोविड-१९ आरटी पीसीआर चाचण्या घेतल्या होत्या.