आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:बोरगडीच्या दोन महिन्याच्या मल्हारवर ऱ्हदय शस्त्रक्रिया यशस्वी, गरजेच्या वेळी खासदार राजीव सातव मदतीला धावले

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

बोरगडी येथील दोन महिन्याच्या मल्हार कोळगीर या चिमुकल्याचा धाप लागू लागली दवाखान्यात दाखविल्यानंतर ऱ्हदयाला छिद्र असल्याचे निदान झाले अन परमेश्‍वर कोळगिर यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला. मात्र परमेश्‍वर यांच्या मदतीला खासदार ॲड. राजीव सातव धाऊन आले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर वर्धा येथील मेघे रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आता मल्हार ठणठणीत होऊ लागला आहे.

नांदेड जिल्हयातील बोरगडी येथील परमेश्‍वर कोळगीर यांच्याकडे एक एकर जमीन आहे. या जमीनीवरच त्यांचे आई,वडिल, पत्नी यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र त्यासाठी त्यांना रोजंदारीवर काम करावे लागते. दोन महिन्यापुर्वी त्यांच्या घरात ‘मल्हार’ या मुलाचे आगमन झाले. मुलगा झाल्याने कोळगीर कुटुंब आनंदात होते. मात्र काही दिवसांतच त्याचा श्‍वास घेतांना धाप लागू लागली. त्यामुळे त्यांनी दवाखान्यात दाखवून सर्व चाचण्या केल्यानंतर त्याच्या ऱ्हदयाला छिद्र असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेसाठी किमान तीन लाखाचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र एवढे पैसे जमवायचे कसे असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला. मात्र परमेश्‍वर कोळगीर यांनी उधार उसनवार करून काही पैशाची तरतुद करून वर्धा येथील मेघे हॉस्टीपलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन नागलवार यांनी भ्रणध्वनीवरून खासदार ॲड. राजीव सातव यांना सांगितली. क्षणाची विलंब न लावला खासदार सातव यांनी आर्थिक मदत केलीच शिवाय तज्ञ डॉक्टरांशीही चर्चा केली. त्यानंतर ता. २९ डिसेंबर रोजी दोन महिन्याच्या चिमुकल्या मल्हारवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगतांना परमेश्‍वर कोळगीर यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...