आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकृतीत सुधारणा:खासदार राजीव सातवांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, इक्मो मशीनची आवश्‍यकता नसल्याचा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार ॲड. राजीव सातव यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होऊ लागली असून त्यांना आता इक्मो मशीनवर ठेवण्याची कुठल्याही प्रकारची आवश्‍यकता नसल्याचा सल्ला गुरुवारी ता. २९ सायंकाळी झालेल्या तपासणीमध्ये तज्ञ डॉक्टरांनी दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

खासदार ॲड. सातव यांना पुणे येथील जहाँगिर रुग्णालयात कोविड उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आल्यामुळे हिंगोली जिल्हयातील नागरीकांसह राज्यातील त्यांच्या चाहत्यांमधून चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. हिंगोली सह राज्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे धाव घेतली आहे. तर आज महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे येथे भेट देऊन खासदार सातव यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तर राज्यमंत्री विश्‍वजित कदम मागील तीन दिवसांपासून त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. खासदार सातवांना रक्तशुध्दीकरण करण्यासाठी इक्मो मशीन लावण्याबाबत तज्ञांची चर्चा सुरु होती.

दरम्यान, आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी खासदार सातव यांची तपासणी केली. यामध्ये त्यांची प्रकृती उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तुर्तास व्हेंटीलेटर असले तरी त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे इक्मो मशीन लावण्याची आवश्‍यकता नसल्याचा सल्ला तज्ञांनी दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सध्या खासदार सातव उपचारास देत असलेला प्रतिसाद लक्षात घेता पुढील दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा होईल असा विश्‍वासही तज्ञांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...