आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्याेगिक चषक:एमआर इलेव्हन, कम्बाईन बँकर्स संघाचा विजय, पीडब्ल्यूडी-जीएसटी इलेव्हन संघ पराभूत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या एएससीएए औद्योगिक टी-20 क्रिकेट चषक स्पर्धेत एमआर इलेव्हन संघाने पीडब्ल्यूडी संघावर 9 गडी राखून विजय मिळवला. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कंम्बाइन बँकर्स इलेव्हन अ संघाने जीएसटी इलेव्हन संघावर 10 गड्यांनी मात केली. सामन्यात सय्यद जलीस आणि हरमितसिंग रागी सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम फलंदाजी करताना पीडब्ल्यूडी संघाचा डाव 16.2 षटकांत अवघ्या 69 धावांवर संपुष्टात आला. हे माफक आव्हान एमआर इलेव्हन संघाने 9.3 षटकांत 1 गडी गमावत सहज पूर्ण केले. यात यष्टिरक्षक सलामीवीर फलंदाज शेख वसिमने 21 चेंडूंत 2 चौकारांसह 20 धावा केल्या.

कर्णधार सय्यद जलीसने 24 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 25 धावांची विजयी खेळी केली. मो. अमर अब्बसने 12 चेंडूंत 4 चौकार खेचत नाबाद 19 धावांचे योगदान दिले. सागर जवळेने एकमेव गडी बाद केला. तत्पूर्वी पीडब्ल्यूडीची आघाडी संपूर्ण फळी ढेपाळली. त्यांच्याकडून विजय गोडसेने 10 आणि यष्टिरक्षक फलंदाज असद अलीने सर्वाधिक 15 धावा काढल्या.

इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकाडा गाठता आला नाही. कर्णधार नीरज देशपांडे अवघ्या 3 धावांवर तंबूत परतला. एमआरकडून अब्दुल समीने 27 धावा देत 3 आणि सय्यद जलीसने 6 धावा देत 3 गडी बाद केले. फिरदीने 2 आण विनोद यादवने एकाला टिपले.

फिरकीपटू हरमितसिंगचे 5 बळी

दुसऱ्या लढतीत प्रथम खेळताना जीएसटी इलेव्हनने 14.5 षटकांत सर्वबाद 81 धावा काढल्या. प्रत्युत्तरात बँकर्सने अवघ्या 29 चेंडूंत 83 धावा ठोकत एकही गडी न गमावता सामना जिंकला. यात सलामीवीर संदीप राजपूत 5 धावांवर नाबाद राहिला. दुसरा सलामीवीर अभिजीत भगतने 23 चेंडूंत 10 सणसणीत चौकार व 3 षटकार खेचत नाबाद 65 धावांची विजयी अर्धशतकी खेळी केली.

संघाला 13 धावा अतिरिक्त मिळाल्या. तत्पूर्वी, जीएसटीकडून सलामीवीर सुरज मुरमुडेने एकाकी लढत देत अर्धशतक झळकावले. मात्र संघाच्या पराभवामुळे ते व्यर्थ ठरले. त्याने ४६ चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार लगावत 59 धावा ठोकल्या. इतर फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकले नाहीत. बँकर्सकडून हरमितसिंग रागीने 4 षटकांत 16 धावा देत 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. इनायत अली सय्यदने 3 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...