आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण वीज जोडणी देताना ग्राहकांकडून सुरक्षा ठेवी घेते. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील 38 लाख 34 हजार 131 वीज ग्राहकांनी सुरक्षा ठेवी भरली आहे. यावर गत आर्थिक वर्षात 21 कोटी 49 लाख 20 हजार रूपये व्याज वीज बिलाच्या माध्यमातून परतावा दोन हप्त्यांत देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारी आणि सिंगल फेज, थ्रीफेज, विद्युत भार आदी बाबी लक्षात घेवून सुरक्षा ठेव आकारली जाते. विद्यमान वीज ग्राहकांसाठी मागील 12 महिन्यांतील वीज देयकाची सरासरी काढून एक महिन्याची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. 1 एप्रिल 2022 पासून नवीन नियमावलीनुसार आता दोन महिन्यांची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येत आहे. मागील 12 महिन्यांतील वीज देयकांची सरासरी महत्वाचा घटक असल्याने वीज वापर हा महत्वाचा मुदा ठरतो.
महावितरणचे अनेक ग्राहक अधिकार्यांना पूर्व कल्पना न देताच स्थलांतर करतात. अनेकजण स्वताच कनेक्शन बंद करतात. आणि थकीत वीजबिल भरत नाहीत. दुसरीकडे महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांपर्यंत वाटप होईपर्यंत साधारण दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागतो. तरीही,महावितरणकडून विनाखंड वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे सुरक्षा ठेव गरजेची आहे. म्हणून एक महिन्याऐवजी आता दोन बिलांची रक्कम जमा करून घेतली जात आहे. 12 महिने वेळेत व नियमित वीजबिल भरणार्याच्या सुरक्षा ठेवीवर बॅंकेतील व्याजदराप्रमाणे व्याजही दिले जाते. या बिलाची रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.