आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सूनचा पाऊस सर्वत्र कमी अधिक फरकाने दाखल झाला आहे. पावसापूर्वी दररोज वादळी वारे वाहते. विजांचा कडकडाट होतो. काही वेळेत पाऊस पडतो आहे. आगामी काळात मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. नैसर्गिक आपत्तीत मराठवाडयातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने नऊ मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.24 तास ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.
काही वेळेतच धो धो पाऊस पडतोय. वादळीवारे सुटते, यामुळे झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणा-या तारांपासून सावध रहावे. त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. तसेच अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीज तारा, खांब, रस्त्यांच्या बाजुंचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्मर्सचे लोखंडी कुंपण, फयुजबॉक्स तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपांचा स्वीचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी.
अशी सुरक्षितता बाळगावी
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक आर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. विशेष म्हणजे टिनपत्रेच्या घरात राहणा-या नागरिकांनी पावसाळयात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबाना किंवा स्टेला जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये. किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा अॅन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपडयावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही. याची दक्षता घ्यावी.
ग्राहक सेवा केंद्र, टोलफ्री क्रमांक
महावितरणची 24/ 7 ग्राहक सेवा सुरू करण्यात आली आहे. शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी सुरु आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रांतील कॉलसेंटर्सचे 18002333435 / 18001023435 / 1912 / 19120 टोलफ्री क्रंमाक उपलब्ध आहेत. मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रंमाकांवर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.