आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनात ‘मुद्रा’काळवंडली!:महाराष्ट्रात मुद्रा लोन योजनेचे 5,659 कोटी रुपयांचे कर्ज थकले, एनपीएचे प्रमाण पोहोचले तब्बल 23 टक्क्यांवर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या उद्योगांना चालना व नवे उद्योग निर्माण व्हावेत, यासाठी केंद्राने २०१५ मध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली. यात बँकेकडून विनातारण कमाल १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. मात्र, योजनेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. राज्यात योजनेतून २०२१ मध्ये २४,७७४ कोटींचे कर्ज वाटप झाले. पैकी ५,६५९ कोटींचे कर्ज थकले असून बँकांचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) २३% वर गेला आहे.

काय आहे योजना
मुद्रा लोनमध्ये तीन विभागांत कर्ज दिले जाते. शिशूमध्ये ५० हजार रुपये, किशोरमध्ये ५० हजार ते ५ लाखांपर्यंत, तर तरुणअंतर्गत १० लाखांपर्यंत कर्ज मिळते. या विनातारण कर्जाचा व्याजदर ७ ते ९ टक्क्यांपर्यंत आहे. पात्र होण्यासाठी कोटेशन, परवाना, आधार कार्ड, फोटो तसेच व्यवसायासंबंधीची माहिती द्यावी लागते.

मुद्रा योजनेला दोन वर्षांच्या कोरोनाकाळाचा बसला सर्वाधिक फटका
प्रकार 2018-2019 2019-2020 2020-2021
शिशू अंतर्गत 4705 कोटी 8614 कोटी 4295 कोटी
किशोर अंतर्गत 8440 कोटी 13517 कोटी 11577 कोटी
तरुण अंतर्गत 8441 कोटी 10398 कोटी 8902 कोटी
एकूण 21587 कोटी 32529 कोटी 24774 कोटी
एकूण 2559 कोटी 5004 कोटी 5659 कोटी
एनपीए 12% 15% 23%

कोरोनाकाळात वाटप 2020 -2021 एकूण कर्ज 57,303 एकूण एनपीए 10,563 18.43%

छोट्या व्यावसायिकांचे हाल
ब्यूटी पार्लर, भाजीपाला विक्रेते, दुकानदार, व्यापारी, छोटे हॉटेलचालकांचा आदींसारख्या छोट्या व्यावसायिकांनी मुद्रा लोनचे कर्ज उचलले. मात्र कोरोना व लॉकडाऊनमध्ये हे व्यवसाय बहुतांशी बंदच राहिले. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे अवघड बनले. परिणामी बँकांचा एनपीए वाढला. दुसरीकडे, मुद्रा कर्ज मंजुरीसाठी राजकीय नेत्यांचा मोठा रेटा असतो. त्यामुळे बँकांची अडचण होते.

तज्ज्ञ : मुद्राच्या पैशांतून घर खर्च भागवण्याची वेळ
नारायण भारती, मसिआचे अध्यक्ष

कोरोनात जागेचे भाडे, वीज बिलासह इतर खर्च भागवणे अवघड झाले. व्यवसाय ठप्प झाल्याने कर्ज भरणे अवघड.
देवीदास तुळजापूरकर, बँकिंग तज्ज्ञ : बहुतांश कर्जदार किरकोळ सेवा क्षेत्रातले आहेत. या व्यावसायिकांना कोरोनाचा फटका बसला.

सतीश मराठे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक
दोन वर्षांच्या कोरोनाकाळात व्यवसाय ठप्प झाल्याने छोट्या व्यावसायिकांवर ख्ूप परिणाम झाला. इतकेच नव्हे तर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना मुद्रातील रक्कम वापरावी लागली.

बातम्या आणखी आहेत...