आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे मुजरा संगीत रंगभूमीला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कालबाह्य होत चाललेल्या नाट्यसंगीताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रविवारी (११ सप्टेंबर) ‘मुजरा संगीत रंगभूमीला’ नाट्यसंगीतपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी ७ वाजता कार्यक्रम होईल.

संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यसंगीताचा इतिहास उलगडणारी ही मैफल असेल. जुन्या-नव्या गाजलेल्या अवीट गोडीच्या गाण्यांचे सादरीकरण जुन्या काळातील पायपेटीसह पंडित मुकुंद मराठे करणार आहेत. बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे.

ज्ञानेश पेंढारकर, पल्लवी पोटे, उत्तरा परांजपे-घाणेकर, अदिती पोटे असे नामवंत कलाकार यामध्ये कलेंचे सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन चित्पावन ब्रह्मण मंडळाचे अध्यक्ष विकास गोंधळेकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...