आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मुक्तिसंग्राम सोहळ्याला खा. इम्तियाज जलील हजर राहणार, गेली सलग सहा वर्षे एकदाही हजेरी लावली नाही

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे माजी आमदार व सध्याचे खासदार इम्तियाज जलील गेल्या ६ वर्षांपासून मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन सोहळ्याला दांडी मारायचे. यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. म्हणून त्यांनी या वर्षी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या निमित्ताने ते व त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपरोधिक स्वागत करणार आहेत.

सात वर्षांपूर्वी इम्तियाज औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडून आले. २०१९मध्ये खासदार झाले. गेल्या ६ वर्षांत ते एकदाही मुक्तिसंग्रामदिनी औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानातील सोहळ्याकडे फिरकले नाही. यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. त्याला उत्तर देताना इम्तियाज म्हणाले की, माझ्यासाठी विकास होणे महत्वाचे आहे. त्यामुळे गेली मी ६ वर्षे मुक्तिसंग्रामदिनी विकास कामांसाठी बाहेरगावी होतो. यंदा मी सोहळ्याला येणार असून मराठवाडा, औरंगाबादचा प्रचंड विकास केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्याचे उपरोधिक स्वागत आंदोलनही करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...