आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी‎ बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन‎

अंबाजोगाई‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न, वस्त्र, निवारा या तर भौतिक व‎ शारीरिक गरजा आहेत, पण माणसाला‎ जगवतो तो विचार. जे पोट हातावर धरून‎ जगतात ते पोटवळीक असतात, जे‎ विचारावर जगतात ते माणूस म्हणून‎ जगतात. विचारांची देवाणघेवाण‎ करण्यासाठीच बहुभाषिक परिवर्तन‎ साहित्य संमेलन आहे, असे मत‎ संमेलनाध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी‎ व्यक्त केले.‎ अंबाजोगाई शहरात शनिवारी‎ राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य‎ संमेलनास ग्रंथदिंडीने उत्साहात सुरुवात‎ झाली. ग्रंथदिंडीत शालेय, महाविद्यालयीन‎ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग‎ नोंदवला होता. तालुक्यातील जिजामाता‎ महिला औद्योगिक उत्पादक सहकारी‎ संस्था मर्यादित धानोरा बुद्रुक, ता.‎ अंबाजोगाईच्या वतीने दोनदिवसीय‎ राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य‎ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.‎ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ चौकात ज्येष्ठ साहित्यिक संतराम कराड‎ यांनी संविधान वाचन केले. सकाळी ११‎ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,‎ वि. दा. सावरकर चौक - मुकुंदराज‎ सांस्कृतिक सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी‎ काढण्यात आली. शहरातील मुकुंदराज‎ सभागृहात संमेलनाचे उद्घाटन प्रकाश‎ महाराज बोधले, संमेलनाध्यक्ष अण्णाराव‎ पाटील, प्रमुख पाहुणे माजी मंत्री पंडितराव‎ दौंड, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष‎ राजेसाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष‎ असिफोद्दीन खतीब, वसंतराव मोरे, उद्धव‎ बापू आपेगावकर, आयोजक मनीषा‎ विद्याधर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.‎ ‎ जोशींना काव्यगौरव पुरस्कार‎ संमेलनात शरद प्रतिभा शेतकरी साहित्य गौरव‎ पुरस्काराने विश्वंभर विराट, काव्य गौरव पुरस्काराने‎ दिनकर जोशी, नाट्यगौरव पुरस्काराने डॉ. सिद्धार्थ‎ तावडे, तर आरोग्यसेवा पुरस्काराने डॉ. लक्ष्मणराव‎ पन्हाळे, डॉ. दीपक फुटाणे, लघुउद्योजक गौरव‎ पुरस्काराने बप्पासाहेब डावकर, समाजसेवा गौरव‎ पुरस्काराने यमुनाबाई सोनवणे, सामाजिक‎ कार्यगौरव पुरस्काराने शकिला बानू शब्बीर शेख,‎ प्रफुल्ल शशिकांत, सूक्ष्म उद्योग गौरव पुरस्काराने‎ सुरेखा बंग, उर्दू शिक्षण गौरव पुरस्काराने मुजीब‎ काजी, योगेश्वरी पायसेस, विश्वंभर ठोंबरे यांना तर‎ कोरोना योद्धा पुरस्काराने अनंत वेडे यांना देण्यात‎ आला. दुर्बल घटक कार्य गौरव पुरस्काराने तोरण‎ सिंग तारासिंग टाक यांना सन्मानित करण्यात आले.‎

अंबाजोगाईचे प्रश्न संमेलनातून समोर आले‎
बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन‎ घडवायचे आहे. सामान्य जनतेचे प्रश्न आता साहित्य संमेलनाच्या‎ विचारपीठावरून मांडायचे अाहे. साठवण तलाव यासारखे प्रश्न पुन्हा‎ एकदा बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरून समोर आले.‎ - असिफोद्दीन खतीब, स्वागताध्यक्ष, बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन

बातम्या आणखी आहेत...