आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:मनपा प्रशासकांनी शुक्रवारी मध्यरात्रीच दिले होते ‘कडक’ लॉकडाऊनचे संकेत; आधी पोस्ट टाकली, सकाळी काढून टाकली, दुपारी पुन्हा टाकली

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (२६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारासच सोशल मीडियावर कडक लॉकडाऊनचे संकेत देणारी पोस्ट टाकली

मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (२६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारासच सोशल मीडियावर कडक लॉकडाऊनचे संकेत देणारी पोस्ट टाकली. त्यास लोकांकडून प्रचंड विरोध होत असल्याचे लक्षात आल्यावर २७ मार्च रोजी सकाळी काढूनही टाकली आणि ८ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची नियमावली तयार होणे सुरू असताना पुन्हा पोस्ट टाकली. पांडेय यांनी आधी सोशल मीडियावर “कोरोनाबाबत मी टोकाचा निर्णय घेत आहे, नागरिकांनी त्यास सहकार्य करावे’ अशी “कडक’ पोस्ट शेअर केली. मात्र थोड्याच वेळात “नो लॉकडाऊन’ म्हणत अनेक लोकांनी त्यास विरोध दर्शवला आणि उतावळेपणातून टाकलेली पोस्ट २७ मार्च रोजी सकाळी गायब झाली!

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सुटीवर असताना पंधरा दिवसांपूर्वीच पांडेय यांनी लॉकडाऊनचा निर्णय झाल्याचे अनेक पत्रकारांना खासगीत सांगितले होते. तेव्हाच पूर्ण शहरात लॉकडाऊन लागला, अशी अफवा शहरभर पसरली होती. त्यामुळे, सुटीवर असूनही जिल्हाधिकाऱ्यांना “लॉकडाऊनचा निर्णय झालेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका,’ असे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकावा लागला होता.

“लॉकडाऊनचा निर्णय कुणी एक जण घेऊ शकत नाही. जिल्हास्तरीय समिती तो निर्णय घेईल आणि मी या समितीचा अध्यक्ष आहे,’ असे त्यांनी ठणकावले होते. त्यानंतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चव्हाण यांनी जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन घोषित केला. गुरुवारी (२५ मार्च) पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले खरे; मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. एकंदरीत लॉकडाऊनला लोकांचा प्रचंड विरोध असल्याची जाणीव पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलेले असतानाही घोषणा करणे टाळले होते. मात्र, पांडेय फारच उतावीळ झाल्याचे पोस्ट प्रकरणावरून लक्षात आले, असे लोकांचे म्हणणे आहे.

मध्यरात्री टाकल्या दोन पोस्ट, सकाळपर्यंत गायब
पांडेय यांनी शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून I am responsible for the covid-19 condition in my city. I am taking few extreme decisions for betterment of friends. Funds plz help me. अशी पोस्ट केली. विशेष म्हणजे त्यांनी शेवटच्या ओळीत ‘Funds’ या शब्दाचा उल्लेख केला होता. तो चुकून झाला की मुद्दाम केला, हा प्रश्नच आहे. या पोस्टनंतर पुन्हा अवघ्या ८ मिनिटांनी त्यांनी we (as a citizen) are responsible for the spread of covid 19 condition in our city. I am taking few extreme decision for betterment of our city. Friends plz help me in this decision अशी एक पोस्ट टाकली. शनिवारी त्यांनी सांगितले की, शुक्रवारीच लॉकडाऊन लागण्याची शक्यता होती. म्हणून मी आधी पोस्ट टाकली होती. पण नियमावली तयार होण्यास वेळ लागत असल्याचे लक्षात आल्यावर काढून टाकली होती आणि नियमावली तयार होताच पुन्हा पोस्ट केली.

पांडेय यांच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया अशा

-वर्षभरानंतर आता कुठे धंदा व्यवस्थित झालाय. इमारत भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार मिळून २ लाख रुपये मासिक खर्च होतो. हे कुठून भरायचे? त्यामुळे लॉकडाऊन लावू नये. - भूषण कोळी, डिजिटल मार्केटिंग ट्रेनर

-कृपया सामान्य जनतेचा, हातावर पोट असलेल्यांचा विचार करा. परवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे नेते मास्क न लावता मजा करत होते त्यांच्यावर काय कारवाई करणार? हिम्मत असेल तर करून दाखवा कारवाई? - संदीप कुलकर्णी, मनसे

बातम्या आणखी आहेत...