आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 अधिकाऱ्यांचा ताफा:सिटी बसमधून मनपा अधिकाऱ्यांनी केली जी-20 च्या कामांची पाहणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा प्रशासकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी स्मार्ट सिटी बसमधून सहा तास प्रवास करत शहरात सुरू असलेल्या जी-२० च्या कामांचा आढावा घेतला. अतिक्रमण, स्वच्छता, उद्यान, रोषणाईची पाहणी करत रस्त्यात येणारे विजेचे खांब काढण्याच्या सूचना प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या.

जी- २० परिषदेचे शिष्टमंडळ २८ फेब्रुवारीला औरंगाबाद लेणी, बीबी का मकबरा आणि सोनेरी महालाला भेट देणार आहे. या संपूर्ण वास्तूंच्या मार्गाची पाहणी आणि सुरु आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. सर्वप्रथम प्रशासकांनी दिल्ली गेटला भेट दिली. तेथून पुढे रंगीन दरवाजा, काला दरवाजा तसेच नौबत, भडकल, बारापुल्ला गेटवरील अतिक्रमण हटवणे, स्वच्छता करणे, विजेचे खांब हलवणे, रोषणाई व सिटी ऑफ गेट्सचे एलईडी बोर्ड व्यवस्थित करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...