आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणपत्र:दिव्यांगांसाठी मनपाचे 17 कोटींचे बजेट; घरकुल, मुलांना शिष्यवृत्ती, उदरनिर्वाहासाठी करणार मदत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग व्यक्तींना आता दरवर्षी आर्थिक लाभासह अन्य सुविधा मिळवण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची गरज नाही. हयातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यावर त्यांना लाभ मिळतील. यासाठी मनपा स्वतंत्र यंत्रणा उभी करणार असून त्यांच्या मदतीसाठी १७ कोटी ५० लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. यातून घरकुल, शिष्यवृत्ती आदींची मदत केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करावी असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने १७ कोटी रुपयांची तरतूद दिव्यांग कल्याणासाठीच्या विविध योजना राबवण्यासाठी केली आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. सोळाशे दिव्यांगांचे अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. वॉर्ड कार्यालयातदेखील काही अर्ज आहेत. हे अर्ज पडताळणीसाठी आरोग्य विभागाकडे देण्यात आले आहेत. त्यांच्या अभिप्रायानंतर पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाईल. मदतीसाठी दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी पालिकेकडे अर्ज करावे लागतात. आता आलेले अर्ज महापालिका विशिष्ट यंत्रणेत संकलित करणार आहे.

त्यामुळे पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज भासणार नाही. दिव्यांग व्यक्तींनी दरवर्षी केवळ हयातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना मदत दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, घरकुलासाठी मदत, निर्वाह भत्ता, वैद्यकीय तपासणीसाठी अर्थसाहाय्य अशा विविध योजना आखण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर निधीतून मदत करावी, असे आवाहन मध्यंतरी मनपाने केले होते. त्यानुसार काही संस्थांनी मदतही केली. आता नव्या दिव्यांगांना मनपाची ही मदत मिळवण्यासाठी जवळच्या वाॅर्ड कार्यालयात नोंदणी करता येईल.

विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० ते १००० रुपये घरकुल योजनेसाठी दिव्यांगांना २५ हजारांची मदत केली जाणार आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. उदरनिर्वाह भत्ता ५० टक्के दिव्यांगांना दोन हजार, तर १०० टक्के दिव्यांगांना तीन हजार रुपये मिळेल. यासाठी १० कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा ५०० आणि १००० रुपये देण्यात येतील. याशिवाय मनपाच्या वाचनालयात अंधांसाठी विशेष पुस्तकांची व्यवस्था केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...