आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी व्यवस्थापन:खाम नदी पुनरुज्जीवनासाठी मनपा आयुक्तांचा गौरव

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाम नदी पुनरुज्जीवन, सांडपाणी व्यवस्थापन व अन्य उपक्रमांसाठी औरंगाबाद महानगरपालिकेला बुधवारी नवी दिल्ली येथील दहाव्या फिक्की वॉटर अवॉर्ड‌्समध्ये ज्युरी स्पेशल अवॉर्ड प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (एफआयसीसीआय) देण्यात आला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांना नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक जी अशोककुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्षा नैनालाल किडवई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी उपस्थित होते.

ज्युरींनी या मुद्द्यांचे केले परीक्षण { औरंगाबाद छावणी परिषद, व्हेरॉक, इको सत्त्व व नागरिकांच्या सहभागाने खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये ५ किलोमीटर नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व पिचिंग करण्यात आली. नदीकाठावर एक लाखापेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. { वर्ल्ड बँकेच्या मदतीने झाल्टा येथे सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचा देशा पहिला उपक्रम कार्यान्वित केला. { उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी महानगरपालिकेने ४१ मुद्दे तयार केले होते, { पाण्याची वेळ सांगण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे तयार करण्यात आलेले जलबेल ॲप १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. { नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत समस्येच्या काळात घेतलेल्या या सर्व उपक्रमांची नोंद घेऊन शहराची निवड फिक्की वॉटर अवॉर्डसाठी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...