आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी चोरीवर मनपाने घातला घाव:बेगमपुरा येथे अवैध नळ कनेक्शन कट करण्यावरून मनपा कर्मचारी आणि नागरिकांची हूज्जत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच अनधिकृत नळ कनेक्शन तोडले जाणार होते. याबाबत वृत्त प्रकाशित करताच, मनपा प्रशासन खडबडून जागे झाले व शनिवारी बेगमपुरा ते साईमंदिर परिसरातील 200 पेक्षा अधिक अनधिकृत नळ दोन जेसीबीच्या माध्यमातून तोडण्यात आले. या कारवाईला महिलांनी कडाडून विरोध केला. पण पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळी 11 वाजताच पथक कारवाईसाठी बिबीचा मकबरा शेजारी बेगमपुरा परिसरात पोहचले. पथकाला पाहताच महिला मोठा विरोध करत खड्डा खोदणार्‍या जेसीबीला रोखले. यामुळे प्रचंड तणाव निर्माणझाला होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केला. तरी महिला ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. गोरगरिबांचे पाणी बंद का करता? तुमच्यात हिंमत असेल तर श्रीमंताचे बेकायदा नळ तोडा, अशी मागणी करत महिलांनी ठिय्या दिला.

दुसरीकडे एक पथक पहाडसिंगपुरा भागात गेले. याठिकाणीही विरोध झाला. पोलिस निरीक्षक पोतदार यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर कारवाई सुरू झाली. रस्त्या शेजारचा भाग जेसीबीने खोदताच त्यातून पाइपचे जाळे निघत होते. त्यामुळे या बेकायदा नळांना तासन् तास पाणी येत असेल, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कारवाईनंतर 200 मिलिमिटर व्यासाच्या वाहिनीवरून पैसे भरून नियमित नळ घ्यावेत, असे आवाहन संतोष वाहुळे यांनी केले. पथकाने सोबत अर्ज देखील आणले होते.

अनधिकृत नळ कनेक्शन तोडले तसेच अधिकृतरित्या जोडून द्या, उषा चौधरी व इंदू धबदुले म्हणाले की,शुद्ध पिण्याचे पाणी देणे मनपा प्रशासनाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. आम्ही नागरिक म्हणून मनपाकडे गत चार वर्षांपासून मागणी करतोय. त्याची दखलच​​​​​​​ घेतली जात नाही. नाईलाजास्तव आम्हाला धिटाई करून अनधिकृत नळ जोडणी करून घ्यावी लागली. पिण्याचे पाणी आम्हाला मिळायलाच हवे तो आमचा मुलभूत हक्क आहे. माजी नगरसेवक सचिन खैरे यांच्या सांगण्यावरून हि कारवाई होते हे बरोबर नसून आम्हाला जसे अनधिकृत नळ कनेक्शन तोडले तसेच अधिकृतरित्या तातडीने जोडून द्यावे, अशी सर्व उपस्थित महिल्यांच्या वतीने आग्रही मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...