आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणनीती:इंधन दरवाढविरोधी आंदोलनातून काँग्रेसची महापालिकेची तयारी

प्रतिनिधीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
चिकलठाणा परिसरातील दहा वाॅर्डांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरुद्ध शनिवारी सकाळी हनुमान चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बैलगाडी, सायकल रॅली काढली. - Divya Marathi
चिकलठाणा परिसरातील दहा वाॅर्डांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरुद्ध शनिवारी सकाळी हनुमान चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बैलगाडी, सायकल रॅली काढली.

इंधन दरवाढीविरुद्ध शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात त्यांनी प्रत्येक वाॅर्डात मतदारांशी संपर्क साधा, अशी सूचना केली. त्याची तातडीने अंमलबजावणी करत शनिवारी चिकलठाणा परिसरातील दहा वाॅर्डांच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरुद्ध हनुमान चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बैलगाडी, सायकल रॅली काढली. असेच आंदोलन सर्व वाॅर्डात केले जाणार आहे. यातून आगामी महापालिका निवडणुकीची तयारी होणार आहे.

काँग्रेसने देशमुख यांच्याकडे औरंगाबाद जिल्हा संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, ते क्वचितच औरंगाबादला येतात. त्याबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याची दखल घेत १६ जुलै रोजी एका बैठकीत त्यांनी दोन महिन्यांतून एकदा विकासकामांसाठी बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसला गतवैभव म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काँग्रेसला मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवावा. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदारांशी थेट भेट घ्यावी, अशी सूचना केली. ती गांभीर्याने घेतल्याचे माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशमुख यांच्या सूचनेनुसार आम्ही इंधन दरवाढीविषयी सर्व वाॅर्डांतील जनतेत जनजागृती करणार आहोत. दरम्यान, शनिवारी झालेल्या बैलगाडी, सायकल रॅलीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे, जगताप यांनी केले. रवींद्र काळे, रामराव शेळके, संदीप बोरसे, अतीश पितळे, गौरव जैस्वाल, मोहित जाधव, पुंडलिक जंगले, मोहन साळवे, अंकुश चौधरी, संजय जगताप, अशोक डोळस, राहुल सावंत, पप्पुराज ठुबे, प्रकाश सानप, सुभाष पांडभरे, बाबासाहेब बोरचटे, प्रकाश डंबाळे, भारत जावळे, अनिल जगताप आदींचा रॅलीत सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...